Ad will apear here
Next
मॉरिशसमध्येही अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी
मॉरिशस : मॉरिशसमध्ये यंदा प्रथमच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. 

यानिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार संमेलन आणि मॉरिशसमधील मराठी भाषिक संघाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उपस्थित होते.

उत्तम कांबळे
‘अण्णा भाऊ साठे हे फुले-शाहू-आंबेडकर यांच्याप्रमाणेच इतिहासाचे एक चकाकणारे पान आहे. त्यांनी देवाच्या मालकीचे जग हे माणसाच्या मालकीचे केलं, ही त्यांच्या विचारांची मोठी ताकद आहे’, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.  


नागनाथ कोत्तापल्ले‘अण्णा भाऊंना नीट समजून घेऊन कृती करण्याची आज गरज आहे,’ असे मत डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिकच्या स्वप्ना थोरात यांनी ‘बुद्ध कबीर भीमराव फुले’ हे गीत सादर केले, तर प्रा. डॉक्टर निशा भंडारे यांनी ‘माझी मैना गावाकडं राहिली...’ या अण्णा भाऊंच्या छक्कडवर सादरीकरण केले. 

कार्यक्रमाचा समारोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी केले. या वेळी साठपेक्षा जास्त अभ्यासक उपस्थित होते
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZZCCD
Similar Posts
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये उच्चशिक्षणामधील बदलासंबंधी कार्यशाळा कुसगाव : ‘कालानुरूप उच्च शिक्षणामधील बदल’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद व अधिसभेची कार्यशाळा पार पडली.
रत्नाई महाविद्यालयात व्याख्यानमाला उत्साहात पुणे : हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे रत्नाई महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान, स्पर्धात्मक परीक्षा, व्यवसाय मार्गदर्शन या विषयांवर नुकतीच व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
मुलांनी बनवलेल्या ‘बायसिकल’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड पुणे : शालेय विद्यार्थ्यांनी ‘अविष्कार सायन्स क्लब’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सायन्स पार्क’च्या सहकार्याने निर्माण केलेल्या ‘बायसिकल’ या विज्ञान लघुपटाची भारत सरकारच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय ‘सायन्स लिटरेचर अँड फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे. हा महोत्सव लखनऊ येथे सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘रिसर्च आविष्कार’ स्पर्धा पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नुकतीच ‘रिसर्च आविष्कार’ स्पर्धा पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागचे प्रमुख डॉ. रवींद्र जायभाय आणि एस. एम. जोशी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील डॉ. शरद पासले यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language